
no images were found
श्री सदगुरु प्रतिष्ठान शहापूर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सदगुरु प्रतिष्ठान शहापूर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री सदगुरु प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रसर असते. पूरग्रस्त लोकांना मदत असो, नदीपाठस्वच्छता अभियान असो, पाणपोई, रक्तदान शिबीर, गरजूंना मदत सामाजिक प्रबोधन, ज्ञानेश्वरीपारायण, वृक्षारोपण इ. सामाजिक कार्यात श्री सदगुरु प्रतिष्ठान नेहमी हिरहिरीने भाग घेत असते.
यंदा २०० गरजू विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य श्री सदगुरु प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. विजय विलास पलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले. या समाजिक कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्री गजानन महाजन गुरुजी, माजी नगरसेवक धोंडीलाल शिरगावे साहेब. श्विष्णुपंत नेवले महाराज, माजी नगरसेवक दादासो भाटले, सौ. लक्ष्मी उदयसिंह पाटील (वहिनी),मारुती कुरियरचे मालक श्री विठ्ठलभाई जमरीया व श्री गोविंद टिळगे उपस्थित राहिले व यांनीही विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
मंडळाचे आधारस्तंभ विलास बसप्पा पलमारे, महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अनिता मोहिते, चैत्रा हाडलगी, पूजा जासूद, मंगल निपाने, कलावती मिरजे, शकुंतला काळगी, वनिता धनवडे, अंबिका पलमारे, श्री ज्ञानेश्वरी पारायणचे अध्यक्ष संजय महाजन, श्री सदगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश मिरजे, सुमित भादुले, पंकज दाधिच, सोमनाथ निपाने, अमित गाडे, मंथन काळगी, शरण यरपल्ली, आदर्श शिंदे यांच्या हस्तेही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास छाया फराकटे, सुनगार मावशी, मोहन पलमारे, शेखर विजापुरे, संदीप पाटील, समर्थ निपाने, राजू कुंबराम आणि श्री सद्गुरु प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, हितचिंतक, भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.