Home शैक्षणिक दूरशिक्षणची  एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरी 

दूरशिक्षणची  एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरी 

32 second read
0
0
174

no images were found

दूरशिक्षणची  एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरी 

 कोल्हापूर (प्रतिनिधी): – शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत एमबीए ( डिस्टन्स मोड) या अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ साठी शिवाजी विद्यापीठाकडून दि.१६ मे रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेनुसार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया फेरी गुरुवार दि.१२ जून रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती प्र.संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी दिली आहे.            

               एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद यांची मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्केटिंग,मानवी संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन आणि प्रोडक्शन व्यवस्थापन तसेच वित्तीय व्यवस्थापन या विषयातून एम.बी.ए. ( डिस्टन्स मोड) पूर्ण करता येणार आहे.या प्रवेश प्रक्रियेतून दूरशिक्षण व ऑनलाईन केंद्र, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, कला, वाणिज्य महाविद्यालय पलूस, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड व श्री. व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी येथील अभ्यास केंद्रात प्रवेशित होता येणार आहे.

              ज्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिलेली आहे अथवा  MAH-CET/ATMA दिली आहे. त्यांना थेट प्रवेश मिळेल.अशा विद्यार्थ्यांनी दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे,असे आवाहन प्रभारी संचालक डॉ.के.बी.पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…