Home मनोरंजन कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकते का? मराठी झी ५ ची नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ 

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकते का? मराठी झी ५ ची नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ 

4 second read
0
0
10

no images were found

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकते का? मराठी झी ५ ची नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ 

          प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी झी ५ ने केली आहे. सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की आणि निर्मिती निर्मिती क्रिएटिव्ह माइंड प्रॉडक्शन्स यांनी केले आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची ही भावनिक कथा आहे. कामाच्या ठिकाणी फुलणारे प्रेम, त्यासोबत येणारी गुंतागुंत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांची प्रभावी मांडणी या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 24 जून 2026 रोजी मराठी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते. कामाच्या ठिकाणी त्या दोघांची अचानकपणे ओळख होते आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळते. सुरुवातीला सहज आणि नैसर्गिक वाटणारी त्यांची मैत्री हळूहळू अशा नात्यात बदलते, ज्याकडे दुर्लक्ष करणे दोघांनाही शक्य होत नाही. एकमेकांविषयीचे तीव्र आकर्षण, समान स्वप्ने आणि खोल भावनिक नाते यांमुळे ते प्रेमात पडतात. मात्र, ज्या वातावरणात प्रेमसंबंधांचे परिणाम भोगावे लागू शकतात. 
कुणाच्याही नकळत एकमेकांकडे पाहणे, लांबणाऱ्या गप्पा, कॉफी ब्रेकदरम्यानचे खास क्षण आणि रात्री उशीरापर्यंत होणारे फोन हे अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्याचा भाग बनू लागतात. त्यातून दोघांमध्ये एक खास प्रमाचे नाते निर्माण होऊ लागते. या नात्यात उत्साह, आनंद तर असतोच, त्यासोबतच अनिश्चितताही असते. मात्र, त्यांचे प्रेम लपवून ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत जाते, कारण कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा, व्यावसायिक मर्यादा, पदानुक्रम आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हे घटक त्यांची परीक्षा घेऊ लागतात.
वेगवान कॉर्पोरेट जीवनशैली आणि आधुनिक आयुष्यातील ताण यांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ गुंतागुंतीच्या प्रेमाचे रोमांच, मन मोकळे करण्यातील भावनिक असुरक्षितता आणि वैयक्तिक आनंद व व्यावसायिक जबाबदाऱ्या एकमेकांमोर उभ्या ठाकल्यावर घ्यावे लागणारे कठोर निर्णय यांचे या सीरिजमध्ये चित्र उभे करण्यात आले आहे. महत्त्वाकांक्षा, आत्मशोध आणि बंद दारांआड जपल्या जाणाऱ्या नात्याचे वास्तव यांचा सामना करताना प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत स्वीकारण्यास अनन्या आणि ऋषी तयार आहेत का, याचा विचार दोघांनाही करावा लागतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अग्निवीर भरती संदर्भात आढावा बैठक संपन्न

अग्निवीर भरती संदर्भात आढावा बैठक संपन्न कोल्हापूर,  : येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोब…