Home मनोरंजन प्रसिद्ध अभिनेत्री उषा बचानी यांची सोनी सबच्या यादें मालिकेत एन्ट्री

प्रसिद्ध अभिनेत्री उषा बचानी यांची सोनी सबच्या यादें मालिकेत एन्ट्री

4 second read
0
0
5

no images were found

प्रसिद्ध अभिनेत्री उषा बचानी यांची सोनी सबच्या यादें मालिकेत एन्ट्री

सोनी सबचं यादें आपल्या प्रेक्षकांना विनोद आणि आकर्षक वैद्यकीय प्रकरणांच्या अनोख्या मिश्रणाने आनंदित करत आहे. डॉ. देव मेहता (इक्बाल खान) यांचं आयुष्य बदलत्या नात्यांमुळे आणि अनपेक्षित वळणांमुळे अधिक गुंतागुंतीचं होत असताना, कथेत आणखी एक भावनिक स्तर जोडण्यासाठी एक नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे.

      कथेत आता ज्येष्ठ अभिनेत्री उषा बचानी प्रवेश करत आहेत, त्या वार्तिका म्हणून दिसतील, ज्यांनाA प्रेमाने आई साहेब म्हणून ओळखलं जातं. त्या डिग्गी (अर्जुन पुंज) यांच्या आई असून, मजबूत मूल्यं, अढळ तत्त्वं आणि शांत पण प्रभावी उपस्थिती असलेली एक सुसंस्कृत स्त्री आहेत. परंपरेशी घट्ट जोडलेल्या आणि आपल्या मराठी वारशाचा अभिमान बाळगणाऱ्या वार्तिका यांचा विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव हा रोजच्या कृतीतून दिसून येतो, मोठ्या दिखाव्यांतून नव्हे. शांत आणि न्यायी असलेल्या त्या प्रामाणिकपणा, आदर आणि सातत्याला सर्वांत महत्त्व देतात. आपल्या मुलगा दिग्विजयसोबतचं त्यांचं घट्ट नातं आणि त्यांचे ठाम विचार कथेला ऊब, भावना आणि रोचक क्षणांची भर घालण्याचं आश्वासन देतात. त्यांना आपल्या सुनेबद्दलही मोठ्या अपेक्षा आहेत. दिग्विजय आणि डॉ. सृष्टि (गुलकी जोशी) लग्न करून आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत असताना, वार्तिकाचा प्रवेश त्यांच्या जीवनात एक ताजं आणि आकर्षक नातं आणणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना या नात्यांचा पुढील प्रवास पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

    आपल्या व्यक्तिरेखे बद्दल बोलताना उषा बचानी यांनी सांगितलं, “जेव्हा मी प्रथम वार्तिकाबद्दल वाचलं, तेव्हा तिच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाने आणि शांत अधिकाराने मला त्वरित आकर्षित केलं. तिचं व्यक्तिमत्त्व आणि रूप दोन्ही अत्यंत देखणं आणि वेगळं आहे. ती परंपरेला महत्त्व देणारी स्त्री आहे आणि मला वाटतं ही गुणवत्ता तिला विलक्षण खास बनवते. वार्तिका आपल्या मुलगा डिग्गीने घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड अभिमान बाळगते आणि त्यांचं आई-मुलाचं नातं तिच्या प्रवासातील सर्वांत हृदयस्पर्शी भाग आहे. यादेंमध्ये सहभागी होत असल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षक माझ्या ‘आई साहेब’ या व्यक्तिरेखेला पाहण्यासाठी उत्सुक असतील आणि तिच्या प्रवासाचा भाग बनतील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध – सार्वजनि…