Home निवड शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची सांख्यिकी अधिकारी पदावर निवड

शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची सांख्यिकी अधिकारी पदावर निवड

2 second read
0
0
11

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची सांख्यिकी अधिकारी पदावर निवड

कोल्हापूर, : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी/ संशोधन अधिकारी (गट-ब, राजपत्रित) पदाच्या भरती प्रक्रियेत शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील सांख्यिकी अधिकारी (DSO)/संशोधन अधिकारी (RO) या पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, आदिनाथ तुकाराम पाटील, रविंद्र एकनाथ देवरे, सोनम श्रीकांत पाटील, निकेत गणेश जाधव, स्वनिल सतीश माने, तेजश्री मनमोहन राजे आणि विद्या बाळासाहेब वालकोळी यांचा समावेश आहे. अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्यासह सर्व शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

या भरती प्रक्रियेत राज्यभरातून निवड झालेल्या २५ उमेदवारांपैकी शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची प्रभावी परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

‘संख्याशास्त्र अधिविभागाची गुणवत्ता अधोरेखित’

संख्याशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आज केंद्र व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रांतही विविध पदांवर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आज आठ विद्यार्थ्यांच्या यशामुळे अधिविभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता नव्याने अधोरेखित झाली आहे. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही त्यांचे यश प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक अभिनंदनास पात्र आहेत, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले आहेत. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी.-बी.एड. विद्यार्थ्यांसाठी १५ दिवसीय प्रवेशोत्तर मार्गदर्शन कार्यक्रमास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी.-बी.एड. विद्यार्थ्यांसाठी १५ दिवसीय प्रवेशोत्तर मार्गदर्शन कार…