no images were found
एनएसई कडून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स च्या प्रसारासाठी ऑग्मोंटची मुख्य भागीदार म्हणून निवड
मुंबई, : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) च्या निर्मिती, व्यवहार आणि प्रसाराला चालना देण्यासाठी ‘ऑग्मोंट एंटरप्रायझेस लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘ऑग्मोंट गोल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड’ची मुख्य भागीदार म्हणून निवड केली आहे. भारतातील सुवर्ण परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी आहे.
या युतीअंतर्गत, ऑग्मोंट सुवर्ण क्षेत्रातील आपल्या दीर्घ अनुभवाचा वापर करून डिजिटल फ्रेमवर्क अधिक प्रगत करेल, तसेच ईजीआर उत्पादनाच्या विकासासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रत्यक्ष सहकार्य पुरवेल. या करारामुळे नियमित चौकटीत भौतिक सोन्याचे ईजीआरमध्ये आणि ईजीआरचे पुन्हा भौतिक सोन्यात सहज रूपांतर करणे शक्य होईल.
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) या डिमॅट स्वरूपातील रोखे आहेत, ज्याद्वारे भौतिक सोन्याची मालकी दर्शवली जाते. हे सोने सेबी मान्यताप्राप्त व्हॉल्ट्समध्ये सुरक्षित ठेवले जाते आणि डिपॉझिटरीजद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवस्थापित केले जाते. प्रत्येक ईजीआरमागे पूर्णपणे भौतिक सोन्याचा पाठिंबा असतो आणि एक्सचेंजवर त्याचा व्यापार करता येतो, ज्यामुळे सोन्याचा औपचारिक वित्तीय प्रणालीत समावेश होतो. या भागीदारीमुळे सोन्याच्या व्यापारासाठी एक पारदर्शक आणि मजबूत यंत्रणा तयार करणे, योग्य किंमत निश्चिती आणि सराफ, रिफायनर्स, व्यापारी तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे हे एनएससीचे उद्दिष्ट आहे.
श्री श्रीराम कृष्णन, मुख्य व्यवसाय विकास अधिकारी, एनएसई म्हणाले:”इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्ससाठी एक समृद्ध आणि बहुआयामी परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने ऑग्मोंटची निवड हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एनएसई ची तंत्रज्ञान आणि लिक्विडिटी फ्रेमवर्क तसेच ऑग्मोंटचा सुवर्ण क्षेत्रातील अनुभव एकत्र आणून आम्ही ईजीआरची निर्मिती आणि पूर्तता सुलभ करत आहोत. यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक अधिक सुलभ होईल. हा उपक्रम सोन्याला भांडवली बाजारात आधुनिक मालमत्ता म्हणून स्थापित करेल.”
श्री केतन कोठारी, पूर्णवेळ संचालक, ऑग्मोंट एंटरप्रायझेस म्हणाले:”इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट परिसंस्थेच्या निर्मितीसाठी एनएसई सोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सोन्याचे रिफायनिंग, पुरवठा आणि वितरणातील आमचा अनुभव आणि एनएसई ची तंत्रज्ञान प्रणाली एकत्र आल्याने भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक सोन्यातील रूपांतरण अधिक जलद, सोपे आणि पारदर्शक होईल. भारतातील सोन्याच्या व्यापारासाठी ईजीआर हा एक विश्वासार्ह मार्ग म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”