Home सामाजिक कोल्हापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून लोकसंस्कृतीचा जागर

कोल्हापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून लोकसंस्कृतीचा जागर

1 second read
0
0
12

no images were found

कोल्हापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून लोकसंस्कृतीचा जागर : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर रोजी लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभवाचा सोहळा

कोल्हापूर, : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील ज्ञान, भक्ती आणि लोकसंस्कृतीचा जागर घडवून आणणारा ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती – लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळा’ सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोविंदराव टेंबे नाट्यगृह, देवल क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञान, भक्ती आणि अध्यात्माच्या विचारांचा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात निवेदक पंकज विष्णू आणि निवेदिका रश्मी आमडेकर सहभागी होणार आहेत. मृण्मयी फाटक आणि ओमकार बंडबे गायन सादर करणार असून, ऋतुराज फडके आणि ओमकार बंडबे भारूड सादर करणार आहेत. तसेच मयुरा पलांडे, संजना पाटील आणि भाग्यश्री दळवी यांच्या नृत्याविष्कारातून कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक उपक्रमातून संतपरंपरा, भक्ती, लोककला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. राज्यातील विविध भागांत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांचा विचार आणि सांस्कृतिक वारसा व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येत आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, कोल्हापूरमधील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ या लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत  खेडेकर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवा…