Home क्राईम  एनआयएचे  महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे; बिष्णोई टोळीतील ६ जण अटक

 एनआयएचे  महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे; बिष्णोई टोळीतील ६ जण अटक

7 second read
0
0
49

no images were found

 एनआयएचे  महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे; बिष्णोई टोळीतील ६ जण अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल ७६ ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासाठी काम करणाऱ्या ६ आरोपींना अटक केली. खलिस्तानी, दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात एनआयएने ही मोठी कारवाई केली आहे.

       एनआयएच्या म्हणण्यानुसार, हे लोक आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नागपाल अंबिया आणि महाराष्ट्रस्थित बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येच्या कटात सामील होते. गेल्या वर्षी पंजाबमध्ये या दोघांची हत्या झाली होती. या दोघांच्या हत्येचा कट तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर्सनी रचला होता.

      एनआयएने अटक केलेल्यामध्ये लकी खोखर, लखवीर सिंग, हरप्रीत, दलीप बिश्नोई, सुरिंदर आणि हरी ओम यांचा समावेश आहे. एनआयएने मंगळवारी ८ राज्यांतील ७६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाई अंतर्गत पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे.एनआयएने मंगळवारी गुंडांना शस्त्रे पुरवणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या हवाला ऑपरेटर्सना लक्ष्य केले. पंजाबमध्ये मुक्तसर येथील लखबीर सिंग, अबोहरचा नरेश यांच्यासह अनेक कबड्डी खेळाडूंना देखील लक्ष्य करण्यात आले. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…