no images were found
IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव यात्रा
: पुरी–गंगासागर–बाबा बैद्यनाथ धाम आणि दिव्य राजस्थान–खाटू श्यामजी–उज्जैन यात्रा
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- भारतातील धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वे यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रांबाबत माहिती देण्यासाठी आज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी IRCTCचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री. हर्षवर्धन सिंह रावत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आगामी यात्रांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत श्री. संजय शर्मा, व्यवस्थापक व श्री. अमोल हळदणकर, कार्यकारी पर्यटन उपस्थित होते.
पुरी–गंगासागर–बाबा बैद्यनाथ धाम यात्रा
8 रात्री / 9 दिवसांची ही धार्मिक यात्रा 30 सप्टेंबर 2026 रोजी सोलापूरहून सुरू होणार असून, यात्रेदरम्यान पुरी, भुवनेश्वर, गंगासागर आणि बाबा बैद्यनाथ धाम (जसीडीह) या प्रमुख तीर्थस्थळांना भेट दिली जाणार आहे. पॅकेज दर ₹16,280/- प्रति व्यक्तीपासून सुरू असून, इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC असे पर्याय उपलब्ध आहेत.
दिव्य राजस्थान–खाटू श्यामजी–उज्जैन यात्रा
11 रात्री / 12 दिवसांची ही यात्रा 21 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूरहून सुरू होणार आहे. यात्रेदरम्यान उदयपूर, नाथद्वारा, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट दिली जाणार आहे. पॅकेज दर ₹18,670/- प्रति व्यक्तीपासून सुरू असून, प्रवाशांना इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2ACचे पर्याय उपलब्ध आहेत.
दोन्ही भारत गौरव पर्यटक रेल्वेची क्षमता सुमारे 750 प्रवाशांची असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रमुख स्थानकांवरून चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुरी–गंगासागर यात्रेसाठी सोलापूर ते नागपूरदरम्यान आणि राजस्थान यात्रेसाठी सोलापूर ते रतलामदरम्यान विविध स्थानकांवर बोर्डिंग/डिबोर्डिंगची सुविधा देण्यात आली आहे.
सर्वसमावेशक पॅकेजमध्ये
आरामदायी रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये डबल/ट्रिपल/क्वाड शेअरिंगवर निवास, संपूर्ण यात्रेदरम्यान शाकाहारी भोजन, AC/Non-AC वाहनांद्वारे स्थानिक प्रवास व पर्यटन, प्रवास विमा आणि समर्पित IRCTC टूर मॅनेजरची सेवा यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पॅकेज दर
पुरी–गंगासागर–बाबा बैद्यनाथ धाम यात्रा:
इकॉनॉमी – ₹16,280/- | 3AC – ₹27,790/- | 2AC – ₹36,940/-
दिव्य राजस्थान–खाटू श्यामजी–उज्जैन यात्रा:
इकॉनॉमी – ₹18,670/- | 3AC – ₹29,200/- | 2AC – ₹38,040/-
दोन्ही यात्रांचे बुकिंग सुरू असून जागा मर्यादित आहेत. इच्छुक प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 8287931886
✉️ bgtmumbai@irctc.com
श्रद्धा, संस्कृती आणि आरामदायी प्रवासाचा अनोखा संगम घडविणाऱ्या या भारत गौरव यात्रांमधून प्रवाशांना भारताच्या समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.