no images were found
रोटरी क्लब ऑफ़ गर्गिजच्या ‘यामिनी’ प्रदर्शनास दिमाख़दार प्रारंभ : हॉटेल सयाजी मध्ये सोमवारपर्यंत राहणार प्रदर्शन खुले
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा आणि दीपावली कालावधी सुरू होण्यापूर्वी कोल्हापूरमध्ये रोटरी क्लब ऑफ़ गर्गिजच्या वतीने यामिनी हे प्रदर्शन भरविण्यात येते.या ‘यामिनी’ प्रदर्शनाचे आज २६ सप्टेंबर २०२६ रोजी दीमाख़दार उद्घाटन रोटरी असिस्टेंट गवर्नर रो. सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट रो विक्रांतसिंह कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. हॉटेल सयाजी मध्ये ‘मेघ मल्हार’ हॉल मध्ये प्रदर्शन सोमवार (ता २८) पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. या कार्यक्रमाला रोटेरियन अँन सौ. मनिषा विक्रांतसिंह कदम उपस्थित होत्या.
या प्रदर्शनास मार्गदर्शन करताना रोटरी असिस्टेंट गवर्नर सौ.अरुंधती महाडिक यांनी मीही रोटरीमध्ये आहे रोटरी मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.रोटरी क्लब गार्गीजच्या महिलांनी एकत्रित येऊन यामिनी हे प्रदर्शन सलग तेरा वर्ष भरविले आहे. याचा उपयोग महिलांना होत असल्याचे सांगून प्रदर्शनास सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे सांगितले.
डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट रो. विक्रांतसिंह कदम यांनी बोलताना रोटरी क्लब ऑफ गार्गीजमध्ये एक संघटितपणे महिला कार्यरत आहेत त्यांचा हा संघटित पणा रोटरी क्लब गार्गीजला भविष्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणतेही राजकारण न करता गार्गीज मधील महिला उत्साहाने आणि आनंदाने संघटित होऊन चांगले काम करत असल्याचे सांगून त्यांच्या या कामाला शुभेच्छा दिल्या.
क्लबच्या अध्यक्षा रो.सौ. सविता पदे हयानी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. यामिनी चेअरमन रो. डॉ. सौ हेमलता कोटकर यांनी यामिनीची व्याप्ति वाढली असुन या वर्षी ११५ पेक्षा जास्त स्टॉल्स अखंड भारतभरातून सहभागी झाल्याचे सांगीतले. यामिनी प्रदर्शनाचे हे तेरावे यशस्वी वर्ष असून; मुंबई, पुणे, दिल्ली, लुधियाना, लखनऊ, इंदौर, चंदेरी, सुरत, जयपुर, गोवा आणि बंगलौर हया ठिकानाहून अनेक नामवंत ब्रँडसचे कपड़े, साड़ी आणि ड्रेस मटेरियल्स, प्रसिद्ध डिजाइनर्स, कारागिर त्यांचे एक्सक्लूसिव डिज़ाइनर रियल ज्वेलरी, रियल डायमंड्स, लैब ग्रोन डायमंड्स, पोल्की, विविध होम डेकॉरचे सामान या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गीजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सीन, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे. महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी चर्चासत्र आयोजित केले जातात. कॅन्सर सेंटरलाही मशिनरी दिलेली आहे, त्याचा उपयोग हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांना होत आहे. स्वयंम, अंकुर, तनिष्क, चेतना या शाळेतील मुलांसाठीही ५-६ स्टॉल विनामोबदला देण्यात आले आहेत. यामिनी मधून उपलब्ध होणारा निधी या विविध विधायक कामांसाठी वापरला जातो.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो. सविता पदे, यामिनी चेअरमन, डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सीमा मालानी, रो. सौ साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो गिरिजा कुलकर्णी, रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर, रो.कल्पना घाडगे, रो. सुप्रिया डोइजड, रो. प्रिया आरगे, रो मेघना शेलके, रो.योगिनी कुलकर्णी, रो. जया महेश्वरी, रो. रेखा सारड़ा, रो. सुजाता लोहिया, रो . बिना जनवाडकर,रो. डॉ .उन्नती सबनीस त्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहेत. हे प्रदर्शन २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २७ व २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी सूत्रसंचालन रो.विशाखा आपटे आणि रो.मोना पाटील यांनी केले.तर आभार सेक्रेटरी रो.सीमा मालानी यांनी मानले.