Home Uncategorized केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

6 second read
0
0
6

no images were found

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

 पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी

कोल्हापूर :  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेने संपूर्ण कोल्हापूरकर आणि राज्यभरातील नाट्यप्रेमी हळहळले होते. मात्र, प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अवघ्या वर्ष-दीड वर्षाच्या विक्रमी कालावधीत नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाचे आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

    नाट्यगृहाचा मूळ ‘हेरिटेज लुक’ (ऐतिहासिक वारसा स्वरूप) कायम राखत, अत्यंत आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसह या वास्तूचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नूतनीकृत केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, यामुळे कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी गती मिळणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम उद्या होणार आहे या पार्श्वभूमीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्य गृह आणि प्रायव्हेट हायस्कूल येथील सभा स्थळाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर रूपाराणी निकम , खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 रविवारी आरोग्य व क्रीडा सुविधांचेही लोकार्पण

या सोहळ्यात केवळ नाट्यगृहासह शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सीपीआर रुग्णालयात झालेल्या विविध अद्ययावत कामांचे लोकार्पण,  शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत हॉकी स्टेडियम आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या पार्किंग सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

नुकतेच गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आज कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे अनेक निर्णय आणि प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात असल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ द…