Home Uncategorized ‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

46 second read
0
0
6

no images were found

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा जादाचा दर मिळणार

कोल्हापूर,  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून श्रावण महिन्याच्या प्रारंभी दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ करण्यात आली आहे.

          यानुसार ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५३.५० रुपयांवरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३६ रुपयांवरून ३७ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.

          सध्या पावसाचे आगमन उशिरा झाल्याने तसेच काही भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याने चाऱ्याच्या उपलब्धतेवर आणि पशुधनाच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दूध संकलनातही चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि दुग्ध व्यवसाय सातत्याने सक्षम राहावा, यासाठी ‘गोकुळ’ने दूध खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, (हि दरवाढ दि.१०/०८/२०२६ च्या मध्यरात्री पासून लागू होईल) गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.    

          गोकुळशी संलग्न सुमारे ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सध्या प्रतिदिन सरासरी १४ ते १५ लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादक हे गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळावे आणि उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.

          सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच महागाईचा सर्वंकष विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासकीय मंडळाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी संघ सदैव तत्पर आहे, असे गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

          दि. ०८ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या संघाच्या प्रशासकीय मंडळ व अधिकारी यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सुधारित दूध खरेदी दराबाबतचे दरपत्रक लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन …