no images were found
धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे मतांवर फरक- पंकजा मुंडे
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १०० दिवस राहिले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चेंना वेग आला असून काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर राज ठाकरे यांच्याकडून महायुतीत सामील होण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीनेही जागावाटपाचा निर्णय जवळपास अंतिम केला असून २७ तारखेला निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी विरोधात गेल्याचे दिसत आहे. याही विषयावर मनोज जरांगे पुढे काय भूमिका मांडतात याकडे आपले लक्ष असेल.