
no images were found
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता 13 मार्च पर्यंत अर्ज करावे – विशाल लोंढे
कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सन 2023-24 साठी आपले रितसर अर्ज दिनांक 13 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
वीरशैवलिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.