
no images were found
वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात
कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. व्ही. वाय. धुपदाळे, डॉ. नीलेश बनसोडे, सुरेश बंडगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.