
no images were found
पत्नी व मुलाच्या हत्त्येप्रकरणी आरोपीस अटक
बीड : माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर आज मंगळवारी ता. ११ पहाटे ३ वाजता पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केलेली आहे. मंजरथ जवळच असलेल्या काळे वस्तीवर वास्तव्यास असलेले पांडुरंग दोडतले यांनी त्यांची पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले व मुलगा पिल्या पांडुरंग दोडतले ही दोघेही झोपेत असतानाच त्यांची तीक्ष्णहत्याराने हत्त्या केली. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले याने स्वतः ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. त्वरित पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले याला अटक केली. या घटनेने सदर भागात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.