
no images were found
विद्यार्थ्यांनी शालेय ज्ञानाबरोबरच कायद्याचेही ज्ञान आत्मसात करावे – श्री.किशोर शिंदे
कुडित्रे ( प्रतिनिधी ):- किशोरवयीन मुला मुलींमध्ये अनेक बदल घडून येतात. शालेय ज्ञानाच्या ग्रहणाबरोबर मुला-मुलींनी कायदे व कलमे यांचे ज्ञान आत्मसात करावे. असे प्रतिपादन श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,कुडित्रे येथे किशोर शिंदे यांनी केले. ते कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत नवीन कायदे जनजागृती मोहीम प्रसार अंतर्गत कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी बरोबरच खडतर परिश्रम,अवांतर वाचन व अभ्यासामध्ये सातत्य व आपले छंदही विद्यार्थ्यांनी जोपासावेत. किशोर वय हे काही घडण्याचे व बिघडण्याचे वय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःवरती नियंत्रण ठेवून स्वयंप्रेरणा व आत्मविश्वास वाटचाल करणे आवश्यक आहे. नकळत होणाऱ्या चुकामुळे गुन्हा दाखल झाल्यास शासकीय नोकऱ्यांच्या वाटा बंद होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रेम वेडे होण्यापेक्षा ध्येयवेडे व्हा असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी हवालदार अविनाश पोवार यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे काम व त्याच्याशी संपर्क कसा साधावा याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए.डी.पाटील तर आभार राहुल चव्हाण यांनी मांडले या कार्यक्रमाला उपप्राचार्य आर. डी. मोरे प्रा. खामकर व्ही.एस. अशोक खाडे, एन व्ही पोतदार, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.