Home Uncategorized पांड्याने टीम इंडियाला जिंकवल्यावर नताशा म्हणाली…

पांड्याने टीम इंडियाला जिंकवल्यावर नताशा म्हणाली…

1 second read
0
0
100

no images were found

पांड्याने टीम इंडियाला जिंकवल्यावर नताशा म्हणाली…

हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने विरोधकांची बोलती बंद केली आहे. मागच्या 6 महिन्यांमध्ये हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली यानंतर नताशासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं, पण तरीही हार्दिक शांत राहून कठोर मेहनत करत होता, ज्यामुळे भारताने 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिका विजयाच्या जवळ आहे असं वाटत असतानाच हार्दिकने क्लासेनची विकेट घेतली. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्येही हार्दिकने मिलरला आऊट करून भारताचा विजय निश्चित केला.
हार्दिक पांड्या भारताच्या या विजयानंतर इमोशनल झाला. मैदानातच हार्दिकला रडू कोसळलं. हार्दिकने मागच्या 6 महिन्यांबाबत भाष्य केलं. आम्ही जे देशाला पाहिजे होतं ते मिळवलं, मागचे 6 महिने कसे गेले? मी एकही शब्द बोललो नाही. मेहनत करत होते, एक दिवस नक्की चमकेन हे मला माहिती होतं, असं हार्दिक म्हणाला.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकच्या नात्यात दुरावा आला असून दोघं घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून जोर धरू लागल्या होत्या. नताशाने तिच्या नावातून पांड्या आडनाव हटवलं, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. आता टीम इंडियाच्या विजयानंतर नताशाची पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तू माझ्या क्षितीजाचा सूर्य आहेस, असं कॅप्शन नताशाने या व्हिडिओला दिलं आहे, पण तिने या पोस्टमध्ये कुणालाही टॅग केलेलं नाही. हार्दिक आणि नताशाने कोरोना महामारीदरम्यान 2020 साली साखरपुडा केला. यानंतर त्यांनी 2023 साली कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये धुमधडाक्यात लग्न केलं.
हार्दिक पांड्याने एका मुलाखतीमध्ये नताशासोबतच्या पहिल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली होती. मी कोण आहे, हे तिला माहिती नव्हतं. तिने मला टोपी, चेन आणि घड्याळ घातलेलं बघितलं तेव्हा हा कुणीतरी आहे, असं तिला वाटलं, असं पांड्या म्हणाला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …