Home शैक्षणिक एमएसबीटीई उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे उल्लेखनीय यश

एमएसबीटीई उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे उल्लेखनीय यश

7 second read
0
0
49

no images were found

एमएसबीटीई उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये न्यू कॉलेज ऑफ फार्मसी चे उल्लेखनीय यश

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी एमएसबीटीई (MSBTE) उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उत्कृष्ट यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

     प्रथम वर्ष डी. फार्मसी परीक्षेत महेक रियाज लांजेकर ८५.६०% हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर गौतमी यल्लप्पा भागोजी ८३.१०%, नंदिनी रवींद्र डोंगळे ८२.१०%, सोफिया मुबारक शेख ८१.४०% आणि साखी सागर माने ८०.८०%  यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले

      द्वितीय वर्ष डी. फार्मसी परीक्षेत रसिका राजकुमार पाटील ८२.७३% हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या पाठोपाठ ऋतुजा राजेश कोळी ८२.५५%, स्वरांजली दत्तात्रय भोसले ८२.४६%, वैष्णवी विजय घोसाळकर ८२.०९% आणि अर्पिता संजय कवटगे ८१.६४% यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले.महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी. फार्मसीचा निकाल ८२ %, तर द्वितीय वर्ष डी. फार्मसीचा निकाल ९०% लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची नोंद केली आहे.

      या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि उत्कृष्ट परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार ह…