Home Uncategorized न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0 second read
0
1
38

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त “बाउल मेडिटेशन आणि योग” या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमामध्ये बाउल मेडिटेशन तज्ज्ञ सौ. गीता पाटील यांनी सिंगिंग बाउल मेडिटेशनद्वारे मानसिक शांतता, तणावमुक्ती व अंतर्मनातील सकारात्मक ऊर्जा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच योगतज्ज्ञ सौ. शुभांगी पारटे यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून नियमित योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे आयोजन न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव यांच्या वतीने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. कुंभार यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत योग हा निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा पाया असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप सर्व सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार ह…