no images were found
महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला
कोल्हापूर : भास्करराव जाधव वाचनालयाची स्थापना सन 1952 मध्ये झाली आहे. श्री भास्करराव जाधव वाचनालयाच्या स्थापनेपासून समाज प्रबोधनासाठी वेळोवेळी अनेक तज्ज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित केली जात होती. सन 1985 पासून प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील थोर व नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली जातात.
शनिवार, दिनांक. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस (गारगोटी) (विषय- कोल्हापूर छ.शाहूंचे राहिले आहे काय !), या विषयावर व्याख्यान संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे आयोजित करणेत आलेले आहे.
जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस गवस हे मराठीतील नामवंत कथा, कादंबरीकार, कवी आणि ललित गद्य लेखक म्हणून प्रसिध्द आहे. त्यांनी भाऊ पाध्ये यांचे कथात्म साहित्य या विषयावर पीएचडी प्राप्त केली आहे. मौनी विद्यापीठ गारगोटी येथे 23 वर्षे अध्यापनाचे तसेच पुणे विद्यापीठ येथे 2005-2007 या कालावधीत मराठीचे अध्यापन त्यांनी केले आहे. ते 2019 साली कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. देवदासी व माकडवाला यांच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे प्रकाशीत साहित्य हुंदका हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1983 साली प्रसिध्द झाला. ग्रामीण स्त्रियांच्या शोकात्मक काहाण्या या कवितेत प्रकटलेल्या आहेत. त्यांचे चौंडक 1985 आणि भंडारभोग 1988 साली या कादंबऱ्या अंधश्रद्धाळू, धार्मिक मानसिकतेने लादलेल्या देवदासी जोगत्यांची प्रथामुळे व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या दुःखाच्या व्यथा मांडणाऱ्या आहेत. त्यांची 1992 साली धिंगाणा आणि 1947 साली कळप या कादंबऱ्यातून गवस शिक्षित तरुण पिढीच्या नवनैतिक दृष्टिकोनातून सामाजिक वास्तवाचे मूल्यमापन करतात. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तनकट हि 1998 मध्ये प्रसिध्द झालेली कादंबरी ग्रामिण संस्कृतीतील जातीय ताण तणाव, जातसमूहांची, अहंतेची मानसिकता, नेत्यांची भ्रष्ट मानसिकता, गावाच्या एकसंधता साठी अपरिहार्यता दर्शविते. त्यांची बबळीचा हि 2012 मध्ये प्रसिध्द झालेली कादंबरी अलीकडील कृषी व्यवस्थेत सर्व स्तरावर सुरु झालेल्या भ्रष्टतेविषयीचे वास्तव मांडते.
2001 साली प्रसिध्द झालेली रिवणावायली मुंगी आणि 2009 साली प्रसिध्द झालेली आपण माणसात जमा नाही हि हे साहित्य प्रसिध्द आहेत. ढव्ह आणि लख्ख ऊन असे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिध्द आहेत. 2006 साली काचाकवडया, 2010 साली कैफियत व 2019 साली लोकल ते ग्लोबल हे त्यांचे ललितगद्य संग्रह प्रसिध्द झाले आहेत. 2006 साली भाऊ पाध्ये यांचे कथात्मक साहित्य आणि 2007 साली भाऊ पाध्ये यांची कादंबरी व 2009 साली कथा हे समीक्षाग्रंथ प्रसिध्द आहेत. राजन गवस यांच्या लेखनाला राज्य शासन साहित्य आकादमी, महाराष्ट्र फौंडेशन, लाभसेटवार, भैरु रतन दमाणी इत्यादी विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या तणकट आणि भंडारभोग या कादंबरीचे कन्नड आणि हिंदी अनुवाद झाले आहेत.
तरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्री भास्करराव जाधव वाचनालयाकडून आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला 2023 साठी नागरीकांनी मोठया संख्येने संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.