no images were found
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोविडची चाचणी सुरु
कोल्हापूर : शहरामध्ये गुरुवार,दि. 21 डिसेंबर 2023 रोजी 1 कोविड रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. या कोवीड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये कोविडची चाचणी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच पुर्व तयारी म्हणून आयसोलेशन रुग्णालय येथे ऑक्सिजनचे 49 बेड सुसज्य ठेवण्यात आले आहेत. सद्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी खबरदारी म्हणून नागरीकांनी मास्कचा वापर करावा, शक्यतो गर्दी करु नये अथवा गर्दीमध्ये जाणे टाळावे, सामाजिक अंतर ठेऊन खरेदी करावी, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत, सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास महापालिकेच्या दवाखान्यामध्ये औषधोपचार घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.