Home आरोग्य टेलिव्हिजन अभिनेत्रींचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या!

टेलिव्हिजन अभिनेत्रींचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या!

2 min read
0
0
15

no images were found

टेलिव्हिजन अभिनेत्रींचे पावसाळ्यामधील स्किनकेअर सिक्रेट्स जाणून घ्‍या!

पावसाळा अनेकांचा आवडता ऋतू आहे, पण त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक आव्हाने देखील घेऊन येतो. आर्द्रता आणि ओलसरपणा वाढल्याने मुरुमांपासून ते डिहायड्रेटेड त्वचेपर्यंत त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात. त्वचा टवटवीत, कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी एण्‍ड टीव्‍हीवरील अभिनेत्री पावसाळ्यामध्‍ये त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम सिक्रेट सांगत आहेत. या अभिनेत्री आहेत गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्‍तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, ”आर्द्रतेमुळे माझी त्‍वचा कोरडी होती, त्‍वचा वरून चिकचिकित होण्‍यासह आतून डिहायड्रेटेड राहते. यावर उपाय म्‍हणून मी पोषक, पण हलक्‍या-फुलक्‍या घटकांचा वापर करते, जे माझ्या त्‍वचेला ओलावा देतात, ज्‍यामुळे तेलकटपणा येत नाही. दिवसाच्‍या सुरूवातीला मी मध व दह्याचे साधे क्‍लीन्सिंग मिश्रण वापरते. मध नैसर्गिक आर्द्रतेप्रमाणे काम करते, तर दही लॅक्टिस अॅसिड देते, जे त्‍वचेला हळूहळू एक्‍स्‍फोलिएट व हायड्रेट करते. या संयोजनामुळे माझी त्‍वचा स्‍वच्‍छ, कोमल व टवटवीत राहते, ज्‍यामुळे दिवसभर उत्‍साहित वाटते. क्‍लीन्सिंगनंतर मी ताज्‍या काकडीचा रस व ग्लिसरीनसह बनवलेल्‍या टोनरचा वापर करते. यामुळे त्‍वचेमधील जळजळ कमी होते, मुरमं न होण्‍यास मदत होते आणि त्‍वचेला ओलावा देखील मिळतो, म्‍हणून हे पावसाळ्यामध्‍ये त्‍वचेवर येणाऱ्या चिकटपणाला दूर करण्‍यासाठी परिपूर्ण आहे. मी आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर केळी व मधापासून बनवलेला फेस मास्‍क लावते. केळ्यांमध्‍ये पोटॅशियम व व्हिटॅमिन्‍स मोठ्या प्रमाणात असतात, जे त्‍वचेला आतून पोषण देतात, तर मध ओलावा कायम ठेवते. हा मास्‍क माझ्या त्‍वचेला चमकदार बनवतो आणि मेकअप व स्‍टुडिओ लाइट्सखाली दीर्घकाळपर्यंत त्‍वचा कोरडी होण्‍याला प्रतिबंध करते. मी कुठेही गेले तरी माझ्या बॅगेमध्‍ये गुलाबपाण्‍याची लहान स्प्रे बॉटल ठेवते. या स्‍प्रेमधून स्प्रिंट्झ विशेषत: आर्द्र वातावरणात बाहेरील शूटिंगदरम्‍यान माझ्या चेहऱ्याला त्‍वरित उत्‍साहित व हायड्रेट करतात.”  

मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाबी म्‍हणाल्‍या, ”पावसाळा त्‍वचेसाठी आव्‍हानात्‍मक ठरू शकतो. सतत आर्द्रतेमुळे त्‍वचेवर मुरमं, तेलकटपणा येण्‍यासोबत त्‍वचा कोरडी होऊ शकते. म्‍हणून मी या ऋतूदरम्‍यान माझे स्किनकेअर रूटिन साधे, पण चांगले ठेवते. माझा आवडता उपाय म्‍हणजे दोन चमचे मीठ, एक चमचा ताज्‍या लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्‍ह ऑइलसह बनवलेले नॅचरल फेशियल स्‍क्रब. मीठ सौम्‍य एक्‍स्‍फोलिएण्‍टप्रमाणे काम करते, त्‍वचेमधील मृत पेशींना दूर करते आणि छिद्रे मोकळी करते, तर लिंबाचा रस त्वचेला उजळवतो आणि तेलकटपणा नियंत्रित करण्यास मदत करतो. ऑलिव्ह ऑइल त्वचेला पोषण देते, एक्सफोलिएशननंतर त्वचा हायड्रेटेड आणि कोमल ठेवते. मी त्‍वचेला आतून स्‍वच्‍छ करण्‍यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या स्‍क्रबचा वापर करते, ज्‍यामुळे त्‍वचा फ्रेश, कोमल व टवटवीत दिसते. पावसाळ्यामधील परिणामांना प्रतिबंध करण्‍यासाठी माझ्या त्‍वचेला याच उपायाची गरज आहे.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या …