no images were found
नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी देशपांडेंचे नाव आंतरधर्मीय विवाह समितीतून वगळले
नांदेड : आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीकडून नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी वकील योगेश देशपांडे यांचे नाव महाराष्ट्र सरकारने वगळले आहे. यासोबतच समितीच्या नावातून आंतरजातीय हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम असल्याचे भाजपने म्हटले आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा धसका घेत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची स्थापना केली होती. एका पत्रकार परिषदेत एनडीटीव्हीने समितीचे सदस्य म्हणून नामनिर्देशित वकील योगेश देशपांडे यांना नांदेड बॉम्बस्फोटातील सहभागाबद्दल विचारले असता, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं होतं.
मात्र आता शिंदे सरकारने देशपांडे यांना समितीतून वगळले आहे.आंतरधर्मीय प्रेमविवाहातील अडथळे समजून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १३ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. तसेच गरज पडल्यास अशा बाबींमध्ये आवश्यक ती कायदेशीर मदत आणि मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम असल्याचे भाजपने म्हटले आहे.