Home निवड डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

19 second read
0
0
125

no images were found

डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड

 

कोल्हापूर(प्रतिनिधी ):– डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील  मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका  डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलचे  लॉरिएट प्रा. अजयन् विनू यांच्या पुढाकारातून हा आंतरराष्ट्रीय संशोधन सहयोग (कोलॅबरेशन) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रचार व संशोधनाला चालना मिळणार आहे.

     डॉ. तिवारी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलमध्ये ग्लोबल इनोव्हेटिव्ह सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड नॅनोमटेरियल्स (GICAN) मध्ये कार्यरत राहणार आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अजयन् विनू हे या केंद्राचे नेतृत्व करत आहेत. 

        या कोलॅबरेशनमुळे  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधन कार्याला तसेच डॉ. तिवारी यांच्या नॅनो बायोटेक्नोलॉजी, माफक खर्चामधील निदान व ट्रान्सलेशनल हेल्थकेअर या क्षेत्रातील योगदानाला अधिक चालना मिळणार आहे.

     या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे, विभाग प्रमुख डॉ. मेघनाद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…