Home स्पोर्ट्स दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या आंतरभारतीचे चेस मास्टर  बुद्धिबळ स्पर्धा 

दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या आंतरभारतीचे चेस मास्टर  बुद्धिबळ स्पर्धा 

20 second read
0
0
20

no images were found

दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या आंतरभारतीचे चेस मास्टर  बुद्धिबळ स्पर्धा 

 

 कोल्हापूर (प्रतिनिधी):- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर व अरिहंत सोशल व एज्युकेशनल ट्रस्ट कोल्हापूर यांनी संयुक्तपणे दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या आंतरभारती चेस मास्टर बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित केल्या आहेत.दुपारी साडेबारा वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर बरोबर एक वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.

              कोरगावकर लॉन्स,हिंद कन्या छात्रालयाजवळ,टाकळा,कोल्हापूर येथे होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार दहा व सोळा वर्षाखालील मुलांच्या स्वतंत्र गटात होणार आहेत. एकूण 25 हजार रुपये रोख बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये  दहा व सोळा  वर्षाखालील मुलांच्या प्रत्येक गटात साडेबारा हजार रुपयाची रोख बक्षीसे व चषक,मेडल्स बक्षीस म्हणून ठेवले आहेत. दोन्ही गटातील विजेत्यांना रोख तीन हजार रुपये व आंतरभारती चेस मास्टर चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.उपविजेत्याला रोख दोन हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख एक हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. दोन्ही गटात पहिल्या दहा क्रमांकांना रोख बक्षिसे ठेवली आहेत. याशिवाय 7  9, 13 व 15 वर्षाखालील मुला/मुलींना प्रत्येक गटात पाच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत.अशी एकूण साठ बक्षिसे ठेवली आहेत.

 स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलां- मुलीनी शुक्रवारपर्यंत प्रवेश फीसह  आपली नावे खालील व्यक्तींकडे  नोंदवावीत व अधिक माहिती घ्यावी.

1) अमोल माळी – 8484851082

2) आरती मोदी -‘8149740405

3) दगडू रायकर – 9766325667

4) समीर जमादार – 9960012870

5) सदाशिव र्हाटवळ – 9421202772

6) राजेंद्र बनसोडे – 9689255577

7)भगवान खिरारी – 8888907379

8) सुरेखा पोवार (मोरबाळे) – 9511515200

 9)इंद्रायणी पाटील – 9158294780

 असे आंतरभारती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुचेताताई कोरगावकर, कार्याध्यक्ष सौ. पल्लवीताई कोरगावकर, उपाध्यक्ष जनरत्न रोटे, सचिव एस एम पाटोळे, सचिव(प्राथमिक) संध्या वाणी, कोषाध्यक्ष संजीवभाई परीख  व सहसचिव भरत शास्त्री यांनी या पत्रकाद्वारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घरात फ्रिज नसला तरी चालेल, पण मुलांसाठी पुस्तकांचे कपाट हवे,,,प्रा. जॉर्ज क्रुज        

घरात फ्रिज नसला तरी चालेल, पण मुलांसाठी पुस्तकांचे कपाट हवे,,,प्रा. जॉर्ज क्रुज  &nbs…