
no images were found
कोल्हापूर तावडे हॉटेल परिसरात भीषण आगीत बस जळून खाक
कोल्हापूर : कोल्हापूरकरांना बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर शहरात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.शहरातील तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तावडे हॉटेल परिसरात सायंकाळी केएमटी बस ही आग लागली. तावडे हॉटेल परिसराजवळ पोहोचताच गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. गाडीतील बिघाड लक्षात येताच चालक यांनी बस रस्त्याकडेला थांबवली. त्यानंतर चालक आणि वाहक गजानन गुरव यांनी तातडीने बसमधील ३० प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच इंजिनमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन ही लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग किती भीषण होती की संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात जवानांना यश आले
भयंकर घटनापरंतु ही आग किती भीषण होती याचा अंदाच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येऊ शकतो. बसला आग लागली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशी आंरडा ओरड करताना या व्हिडिओत ऐकू येत आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यात बस जळून खाक झाली आहे.