no images were found
रेशनकार्डचे नवे नियम सरकारकडून जारी; या 4 स्थितीत रद्द होईल आपलं रेशन कार्ड
शिधापत्रिका अथवा रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिलं जातं. सरकारने या वर्षीही म्हणजे 2023मध्येही रेशन कार्डधारकांना मोफत रेशन देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं.मात्र, अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे.
सरकारकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे, की अशा लोकांनी स्वतःहून आपले रेशन कार्ड रद्द करावे. असे न केल्यास, अशा लोकांचे कार्ड तपासून रद्द केले जातील. अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. तसेच, ते जेव्हापासून रेशन घेत आहेत, तेव्हापासूनच्या रेशनची वसुली केली जाईल.
जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पादनातून 100 चौरस मीटरचा प्लॉट/ फ्लॅट अथवा घर, चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, शस्त्र लायसन्स असेल, तसेच गावात दो लाख आणि शहरी भागात तीन लाखहून अधिक वार्षिक कौटुंबीक उत्पादन असेल तर अशा लोकांना आपले रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.