
no images were found
‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिका मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील दैनंदिन, संघर्षाचे आणि हृदयस्पर्शी क्षण दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकत आली आहे. या मालिकेत वेळोवेळी सामाजिक विषयांना स्पर्श करणारी कथानके देखील सादर होतात. महिलांच्या स्व-संरक्षणाच्या विषयावरील आगामी कथानकात आपल्या समाजातील आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि यात बदल कसा करता येईल, याचा समजूतदारपणे विचार करण्यात आला आहे.
आगामी भागांमध्ये, छोटी किट्टू (माही सोनी) सेल्फ-डिफेन्सच्या क्लासला जाण्याची इच्छा व्यक्त करते. दक्कू (दीपक परीक) आणि हर्षद (अमित सोनी) आधी तर तिची कल्पना धुडकावून लावतात, की मुलींना सेल्फ-डिफेन्सची काय गरज आहे? पण राजेश वागले (सुमित राघवन) त्यावर एक वेगळे आणि पुरोगामी मत मांडतो. कारण त्याला असे वाटते की, मुलांइतकाच मुलींना देखील स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. जेव्हा साक्षी (चिन्मयी साळवी) आणि गुनगुन (नंदिनी मौर्य) यांना बसमध्ये छळणुकीचा अनुभव येतो, तेव्हा हर्षदला जाणीव होते आणि तो आपल्या मतावर फेरविचार करून शेवटी कबूल करतो की, राजेशचे म्हणणे खरे आहे. त्यानंतर साई दर्शन सोसायटीतल्या सगळ्या महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी सोसायटीत एका मार्शल आर्ट प्रशिक्षकाची एंट्री होते. पुरुष घरातली जबाबदारी सांभाळतात आणि महिला प्रशिक्षण घेण्यास बाहेर पडतात. मागाहून त्या त्याच बसमध्ये चढून त्या त्रास देणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्याची एक योजना आखतात.
स्व-संरक्षणाच्या प्रशिक्षणामुळे महिला सशक्त होतील का आणि सुरक्षा आणि ताकदीची गरज मुलगा मुलगी सगळ्यांसाठी असल्याचा संदेश घराघरात पोहोचवू शकतील का?
राजेश वागलेची भूमिका करत असलेला सुमित राघवन म्हणतो, “राजेश वागले ही व्यक्तिरेखा नेहमी एक प्रेरणा देते, कारण, तो नेहमी घरात आणि समाजातील लैंगिक समानतेचा पुरस्कार करतो. येथे देखील, त्याला हे ठामपणे वाटते की, जर एखाद्या मुलीला स्व-संरक्षण शिकावेसे वाटत असेल, तर तो तिचा हक्क आहे आणि तिला त्याची गरज देखील आहे. त्याला वाटते, मुलींना त्यांच्या इच्छेनुसार काहीही बनण्याची मुभा असली पाहिजे. त्या नेहमीच सशक्त, स्वतंत्र आणि निडर असल्या पाहिजेत. एक पिता म्हणून, रक्षण करणे हा त्याचा स्वभाव आहे, पण तो हे जाणतो की, मुलींनी स्व-संरक्षण करण्यातच खरी सुरक्षा आहे. हे कथानक महत्त्वाचे आहे, आणि हा विषय या मालिकेत इतक्या संवेदनशीलतेने हाताळला जात असल्याबद्दल मला आनंद होत आहे. हे संभाषण घराघरात पोहोचले पाहिजे की, सुरक्षा आणि ताकद यांची गरज केवळ मुलांनाच नाही तर सगळ्यांना आहे.”