
no images were found
पवन कुमार सिंग यांनी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अनिता भाबीच्या माजी प्रियकराच्या भूमिकेत प्रवेश!
अद्वितीय विनोदी शैली आणि टेलिव्हिजनवरील विनोदी मालिकांमधील उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता पवन कुमार सिंग एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या कलाकारांमध्ये सामील झाले आहेत. पवन अनिता भाबीचा (विदिशा श्रीवास्तव) माजी प्रियकर चंदनची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत. चंदनच्या अनपेक्षित आगमनाने मालिकेच्या कथानकाला अचंबित करणारे ट्विस्ट मिळेल, ज्यामुळे मॉडर्न कॉलनीमधील रहिवाशांना धक्का बसेल. आपला आनंद व्यक्त करत पवन कुमार सिंग म्हणाले, ”पहिल्यांदा पात्राबाबत ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचे तर पात्रापेक्षा अधिक मला जवळपास दशकापासून प्रभुत्व गाजवत असलेल्या मालिकेचा भाग होण्याचा आनंद झाला. मी स्वत: मालिका ‘भाबीजी घर पर है’चा मोठा चाहता आहे आणि मी प्रशंसा केलेले कलाकार व पात्रांसोबत काम करण्याची संधी मिळणे उत्साहवर्धक आहे. मला खात्री आहे की, मालिकेमधील माझा प्रवेश प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करेल, तसेच पात्रांसाठी काहीसा तणाव निर्माण करेल (हसतात).”
आपली भूमिका व आगामी एपिसोडबाबत सांगताना पवन म्हणाले, ”चंदन अनिताचा कॉलेजमधील माजी प्रियकर आहे, जो आता लंडनमध्ये स्थायिक आहे. तो पुन्हा तिच्याशी संपर्क साधतो आणि तिच्यासमोर फायदेशीर व्यवसाय भागीदारीचा प्रस्ताव ठेवतो, तसेच तो तिला त्याच्यासोबत लंडनला येण्यास सांगतो. तो तिला भेटण्यासाठी कानपूरला देखील येतो. अनिता चंदनसोबतच्या गतकाळाबाबत विभुतीला सांगते, ज्यानंतर विभुती पूर्णपणे स्तब्ध होऊन जातो. ड्रामाला रोमांचक वळण मिळते, जेथे चंदन अनिताला विभुतीला घटस्फोट देण्यास आणि त्याच्यासोबत लंडनमध्ये नवीन जीवनाची सुरूवात करण्यास सांगतो. अनिता होकार देते आणि सर्वांना धक्का बसतो. या ट्विस्टमुळे विभुती आणि तिवारी दोघेही भावनिक होऊन जातात. अनिताला लंडनला जाण्यापासून थांबवण्यासाठी ते वेगवेगळ्या उपायांचा प्रयत्न करतात, जसे टीका (वैभव माथूर), टिल्लू (सलिम झैदी) आणि मल्खान (विपिन हीरो) यांची मदत घेऊन प्लॅन आखतात, जे आता स्थानिक गुंड बनले असून खंडणी, अपहरण व धमकी यांसारखी कामे करतात. अनपेक्षित घटनांसह प्रेक्षकांना हास्यपूर्ण गोंधळ आणि मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे.”