Home मनोरंजन ‘तेनाली रामा’ मालिकेत अंकित भारद्वाजची एंट्री, 

‘तेनाली रामा’ मालिकेत अंकित भारद्वाजची एंट्री, 

2 second read
0
0
74

no images were found

‘तेनाली रामा’ मालिकेत अंकित भारद्वाजची एंट्री, 

आकर्षक वळणे आणि गुंतगुंतीच्या व्यक्तिरेखा यांच्यामुळे सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेधक रहस्ये आणि जबरदस्त नवीन व्यक्तिरेखा यांच्यासह मालिकेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आता अंकित भारद्वाजच्या एंट्रीसह मालिकेने एक थरारक वळण घेतले आहे. अंकित अनंतय्या या मोहक व्यक्तिमत्त्वाच्या माणसाची भूमिका करत आहे, ज्याची काळी आणि धक्कादायक बाजू हळूहळू उघड होत जाते.

अनंतय्या हा राघवन (प्रदीप सोनी) नामक एका सन्मान्य प्रधानाचा मुलगा आहे आणि मोहकता, बुद्धिमत्ता आणि शक्तीचे मूर्तिमंत रूप आहे. तो वर्तनाने सुसंस्कृत आणि दिसायला कुलीन आहे. तो सहजगत्या लोकांचे मन जिंकतो- खास करून धरणीचे (मृणाली शिर्के)! पण त्याच्या या मोहक मुखवट्याच्या मागे एक अधिक गुंतागुंतीचे सत्य दडलेले आहे.

अनंतय्या तेनाली रामाच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा आपल्या सोबत एक सावट घेऊन येतो. या व्यक्तिमत्त्वात अनेक कंगोरे आहेत- महत्त्वाकांक्षा, गुप्तता आणि सत्तेची लालसा. एक कोमल रोमान्स म्हणून ज्याची सुरुवात होते त्यात हळूहळू काळंबेरं दिसू लागतं. त्याच्या शब्दाला वजन येते तसे त्याच्या वागण्यात एक थंडपणा येतो. अंकित भारद्वाजने हे दुहेरीपण सुंदर प्रकारे सादर केले आहे. कोमलपणा आणि तणाव, आपलेपणा आणि हिशोबीपणा यांच्यातील समतोल छान साधला आहे. त्याच्या एंट्रीमुळे कहाणीला कलाटणी मिळते, जेथे युती अस्पष्ट होऊ लागतात आणि विश्वासाची खरी किंमत उघड होऊ लागते.

अनंतय्याची भूमिका करणारा अंकित भारद्वाज म्हणतो, “अनंतय्या एक आगळीवेगळी व्यक्तिरेखा आहे. ज्याच्याबद्दल प्रेम वाटते की भीती हे नक्की सांगता येत नाही. मला सगळ्यात जास्त या गोष्टीने आकर्षित केले की, त्याच्या वागण्याचा अंदाज तुम्हाला येत नाही. तो सौम्य, रोमॅंटिक आणि शांत दिसतो पण त्या मोहक मुखवट्याच्या खाली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि काळं मन आहे. खलनायकासारखा न दिसणारा खलनायक साकारणे रोमांचक आहे. तो साकारताना संयम ठेवावा लागतो, शब्दांपेक्षा नजरेने जास्त बोलावे लागते. व्यक्तिमत्त्वात विविध स्तर असलेल्या व्यक्तिरेखा साकारायला मला पहिल्यापासूनच आवडते. अनंतय्याने मला ती संधी दिली. हा प्रवास उलगडताना बघायला प्रेक्षकांना आवडेल आणि त्यात त्यांना आश्चर्याचा धक्का देखील बसणार आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…