Home Video कौस्तुभ गावडे यांच्या विजयाने विवेकानंद शिक्षण संकुलात जल्लोष!

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाने विवेकानंद शिक्षण संकुलात जल्लोष!

12 second read
0
0
16

no images were found

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाने विवेकानंद शिक्षण संकुलात जल्लोष! विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी):- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवल्यानंतर कोल्हापुरातील विवेकानंद शिक्षण संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या विजयानिमित्त बालचमूंसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष केला. आनंदोत्सवाच्या माध्यमातून सर्वांनी या विजयाचा आनंद साजरा केला.

       श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कौस्तुभ गावडे यांनी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या विजयाचे वृत्त समजताच विवेकानंद शिक्षण संकुलातील बालचमू, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

    यावेळी उपस्थितांनी एकमेकांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद व्यक्त केला. संकुलातील उत्साही वातावरणामुळे परिसरात आनंदोत्सवाचे चित्र पाहायला मिळाले.शिक्षण क्षेत्राशी संबंधित निवडणुकीतील या विजयामुळे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिवारात आनंदाचे वातावरण असून, कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…