Home Video बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

12 second read
0
0
9

no images were found

 बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

कोल्हापूर  (प्रतिनिधी):- सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत असेल, तर आरोग्य यंत्रणा नेमकी कोणासाठी काम करते? सीपीआर रुग्णालयाच्या औषध भांडारातील कथित तुटवड्यामुळे हा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. औषध खरेदीसाठी साडेसहा कोटी रुपये शिल्लक असतानाही सलाईन, शुगर तपासणी पट्ट्या, ग्लोव्हज, कॉटन आणि जेलकोसारख्या साहित्याची वानवा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बेलेकर यांनी केला आहे.

      सीपीआरसह जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आणि इचलकरंजीतील सामान्य रुग्णालयातील औषध पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा त्यांनी केला. औषध खरेदीतील कथित दिरंगाई आणि नियोजनातील गोंधळामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पैसे आहेत, मग औषधे कुठे अडकली?

औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध असतानाही खरेदी प्रक्रिया रखडली कशी? जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी प्रस्ताव कोणत्या कारणाने नाकारला? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी बेलेकर यांनी केली आहे.

औषध भांडारातील पूर्वीचे कर्मचारी सागर नागवेकर यांच्या बदलीनंतर परिस्थिती बदलल्याचा दावा करत बेलेकर यांनी फार्मासिस्ट राम करले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

निलंबन करा, चौकशी करा; औषध पुरवठा तातडीने सुरळीत करा!

रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक साहित्याचा तुटवडा ही गंभीर बाब असून, याची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. फार्मासिस्ट राम करले यांना तातडीने निलंबित करावे, औषध खरेदीतील अडथळे दूर करावेत आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी बेलेकर यांनी केली आहे.

आता प्रशासन उत्तर देणार की रुग्णांची परवड सुरूच राहणार? साडेसहा कोटींचा निधी, औषधांचा कथित तुटवडा आणि रखडलेली खरेदी याबाबत प्रशासनाने तातडीने खुलासा करावा. अन्यथा, सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

नागळा पार्क मध्ये 19 ऑक्टोबरला भव्य दांडिया स्पर्धा.   

नागळा पार्क मध्ये 19 ऑक्टोबरला भव्य दांडिया स्पर्धा.          कोल…