Home Video न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

10 second read
0
2
13

no images were found

न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) यांच्या वतीने व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहकार्याने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ साजरा करण्यात येत आहे. यावर्षीचा विषय ‘स्वस्थ भारत : प्रतिजैविक प्रतिकारशक्तीशी मुकाबला’ (Swastha Bharat: Combating Antimicrobial Resistance) हा आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायटोन स्पर्धा, लीफलेट स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा, तर १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पथनाट्य व रील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून एस. ए. राऊत मॅडम, श्री. वाय. के. पुजारी सर ,सौ. एन. एस. शेटे मॅडम, आणि सौ. आर. आर. पाटील मॅडम हे काम पाहत आहेत.
या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ . ए. आर. पुजारी यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यास प्रोत्साहन मिळाले.
प्रतिजैविकांचा योग्य व जबाबदारीने वापर, प्रतिजैविक प्रतिकारशक्तीबाबत जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद माळशिरस,…