
no images were found
कोतोली-वाघवे परिसरात बिबट्याचे दर्शन
कोतोली : वाघवे (ता. पन्हाळा) कुराडवाडी /मानेवाडी येथील गुऱ्हाळानजीक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. परिसरातील गुऱ्हाळ घरे सध्या रात्री अधिकवेळ सुरु असतात. गुऱ्हाळघराच्या जवळून जात असताना काही लोकांनी बिबट्याला पाहिले. कोल्हापुरमधून ये-जा करीत असलेल्यांची या परिसरात रात्रीच्यावेळी वर्दळ असते. कामानिमित्त लोक या मार्गावरून ये-जा करीत असतात. वाघावे परिसर पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असल्यामुळे आसपास जंगल आहे. भोवतालच्या ऊस शेतवडीत देखील बिबट्याचे दर्शन अनेकदा घडल्यामुळे परिसरातील लोकांत घबराट निर्माण झाली आहे. तरी वनखात्याने याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.