no images were found
२८ नोव्हेंबरपासून भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षा
नाशिक : भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भू करमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदांसाठीची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल, अशी माहिती नाशिक भूमि अभिलेख कार्यालयाने दिली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा (कॉम्पुटर बेस्ड टेस्ट) येत्या २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबतची माहिती भूमि अभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in येथे उपलब्ध आहे.