Home Uncategorized संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड:

संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड:

48 second read
0
0
12

no images were found

संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा  आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड:

मान्सूनपुर्व कामाच्या तयारीचा प्रशासकांनी घेतला आढावा

कोल्हापूर  : संभाव्य पूर परिस्थीतीचा  सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधीत सर्व अधिका-यांना दिल्या. मान्सून 2026 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा आज त्यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत सर्व अधिका-यांची सकाळी हि बैठक घेण्यात आली.

            आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी यावेळी विभागीय कार्यालय अंतर्गत नाल्यांची व चॅनेलची सफाई पुर्ण झाली का याची खात्री करणे. त्याच बरोबर अडचनीच्या ठिकाणच्या चेंबरर्सवरील काँक्रेट काढून सफाई करुन घेणे व त्याठिकाणी छावणी बसवून घेण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उपशहर अभियंता व मुख्य आरोग्य निरिक्षक तथा उप-आयुक्त, सहा.आयुक्त यांना दिल्या. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन त्यांना नोटीसा काढणे, तसेच धोकादयक इमारतीमधुन जर नागरीक स्थानांतर होत नस्तील तर त्यांना पुर्व सुचना देवून त्यांचे पाणी व लाईट कनेक्शन खंडित करण्याच्या सूचना  दिल्या. ज्या धोकादायक इमारतींचे न्यायप्रविष्ठ प्रकरणे अस्तील तर महापालिकेतर्फे अॅफिडेव्हीट करुन घेणेबाबत सुचित केले. त्यांवर स्ट्रक्चरल ऑडिट किती इमारतींचे केले, किती दुरुस्त केल्या याची माहिती पुढील बैठकीपुर्वी देणे व कारवाई वेगाने करा अशा सुचना उपशहर अभियंता यांना दिल्या व  पूर बाधित क्षेत्रातील नागरीकांच्या स्थलांतरीत 30 ठिकाणांची पाहणी करुन आवश्यक त्या सुविधा आताच करुन घेण्याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क पावसा पुर्वी करुन घेणे. शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसाळयापुर्वी उतरवून घेण्याची दक्षता उद्यान व विद्युत विभागाने घ्यावी. पुराच्या दरम्यान होणाऱ्या पाण्याच्या अडचणी लक्षात घेत फिल्टर हाऊस यांची दुरुस्ती करुन घेणे व पुराच्या वेळी पाणी टँकरची व्यवस्था ठेवणेची सूचना जल अभियंता यांना दिल्या.  पूर बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करणेसाठी व जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेसवर मागील वर्षी प्रमाणे नियोजन करावे. ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते अशा भागांची यादी तयार करुन नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे नियोजन करा. महापालिकेबरोबरच आवश्यकता भासल्यास खाजगी बोटी चालक यांचे फोन नंबरसह यादी तयार करा व पूर परिस्थितीमध्ये 24 तास दक्षता पथक कार्यरत ठेवणेचे सुचना मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या. संभाव्य पूर परिस्थीतीमध्ये औषधांची, टँकरची व इतर अनुषंगिक जे साहित्य लागते ते घेण्यासाठी आताच निविदा प्रक्रिया पावसाळयापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

         यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, नगररचना सहा.संचालक विनय झगडे, मुख्य शहर अभियंता रमेश मस्कर,  जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुण गुजर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कार्यशाळा प्रमुख संजय भोसले, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, इस्टेट ऑफिसर शितलकुमार साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

बझबॉल्झ आपली मजबूत उपस्थिती निर्माण करण्यास सज्ज

बझबॉल्झ आपली मजबूत उपस्थिती निर्माण करण्यास सज्ज मुंबई: बझबॉल्झ हा जागतिक स्तरावर लोक…