
no images were found
“शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” निबंध स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येक विभागातून जिल्हा स्तरावर पहिले तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. निबंध दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET) शाहूपुरी, ३ री गल्ली, बी. टी. कॉलेज परिसर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी कळविले आहे.
निबंध स्पर्धेचे स्तर व विषय याप्रमाणे-
पूर्व प्राथमिक शिक्षण (अंगणवाडी सेविका)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले पूर्व प्राथमिक शिक्षण.
प्राथमिक शिक्षण १ली ते ८ वी ला अध्यापन करणारे शिक्षक)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले प्राथमिक शिक्षण.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (९ वी ते १२ वी ला अध्यापन करणारे शिक्षक)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण.
उच्च शिक्षण (पदवी आणि पदव्युत्तर पदवीला अध्यापन करणारे प्राध्यापक)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रतिबिंबित झालेले उच्च शिक्षण.