no images were found
‘दूसरी मॉं’ मालिका ने पूर्ण केले १०० एपिसोड्स
‘दूसरी मॉं’ मालिका साठी सेलिब्रेशनची वेळ आहे, कारण मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झालेली ही मालिका उत्तर प्रदेशमध्ये पती, दोन मुली व सासरच्या माणसांसोबत राहणाऱ्या एका महिलेच्या कथेला सादर करते. ती व तिचा पती नकळतपणे त्याच्या अवैध मुलाला दत्तक घेतात, ज्यानंतर त्यांचे आनंदी, उत्साही कौटुंबिक जीवन ठप्प होऊन जाते. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची टेलिव्हिजनवरील आवडती कौटुंबिक मालिका बनली आहे. मालिकेचे स्टार कलाकार नेहा जोशी (यशोदा), आयुध भानुशाली (कृष्णा)आणि मोहित डागा (अशोक) यांनी १०० एपिसोड्सचा टप्पा गाठण्याबाबत त्यांचा उत्साह व्यक्त केला.यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘आमच्या मालिकेने १०० एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे यावर माझा विश्वास बसत नाही. मालिका ‘दूसरी मॉं’सह माझा प्रवास खास राहिला आहे. मला ही संधी मिळाली तेव्हा मी नर्व्हस व तितकीच उत्साहित होते. माझा विवाह झाला त्याच आठवड्यात मला मालिकेसाठी जयपूरला जावे लागणार होते. पण मी माझ्या पतीचा पाठिंबा आणि मालिकेचे दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे यशोदा भूमिका साकारण्याचे ठरवले. या यशासह मला वाटते की, मी योग्य निर्णय घेतला. माझे सह-कलाकार आणि मालिकेसााठी मेहनत घेत असलेल्या टीमच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळणे शक्य नव्हते. त्यांनी सर्वकाही सुरळीत केले. या मालिकेने मला कलाकार म्हणून अनेक भावना अनुभवण्याच्या अनेक संधी दिल्या आहेत. आम्ही इथवर पोहोचण्याचा मला आनंद होत आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हे यश आम्हाला प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन करत राहण्यास प्रेरित करते.’’