Home राजकीय भारताची सुरक्षा धोरणे आता आत्मनिर्भर व निर्णायक आहेत: अमित शहा : ऑपरेशन सिंदूर: राष्ट्रीय सुरक्षेतील एक निर्णायक क्षण

भारताची सुरक्षा धोरणे आता आत्मनिर्भर व निर्णायक आहेत: अमित शहा : ऑपरेशन सिंदूर: राष्ट्रीय सुरक्षेतील एक निर्णायक क्षण

10 second read
0
0
8

no images were found

भारताची सुरक्षा धोरणे आता आत्मनिर्भर व निर्णायक आहेत: अमित शहा : ऑपरेशन सिंदूर: राष्ट्रीय सुरक्षेतील एक निर्णायक क्षण

 

केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी बीएसएफच्या 18 व्या प्रतिष्ठापना समारंभ आणि प्रतिष्ठित रुस्तमजी स्मृती व्याख्यानास केवळ औपचारिकरित्या उपस्थित न राहता, संपूर्ण देशाच्या सुरक्षेबाबत असलेली जाणीव त्यांनी यावेळी स्पष्टपणे मांडली. ही एक सामान्य उपस्थिती नव्हती, तर ही एका दूरदृष्टी असलेल्या रणनीतीकाराची उपस्थिती होती, जो धोरणाला अचूक रणनीतीत रूपांतरित करतो. पोलादी दृढनिश्चय ठेवणारा एक राजकारणी यातून दिसून येतो. भारताच्या सुरक्षेचे शिल्पकार अमित शहा यांनी स्पष्ट सांगितले की भारत आता फक्त प्रतिक्रिया देत नाही, तर योग्य वेळी कठोर प्रत्युत्तर देखील देतो.

‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानच्या दहशतवादातील सहभागाचे पुरावे उघड करत अमित शहा म्हणाले, “ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या शवपेट्या उचलताना पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दिसणे, हेच सर्वात स्पष्ट पुरावे आहेत. पाकिस्तान आता फक्त दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवणारा देश नाही, तर त्यांचा रक्षक बनला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यातील खोलवर रुजलेले संगनमत पूर्णपणे उघड केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारताला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करावा लागला, अनेक वेळा सडेतोड उत्तर न देताच पाकिस्तानला सोडले गेले. पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर हे चित्र बदलले. उरीनंतर सर्जिकल स्ट्राइक, पुलवामानंतर हवाई हल्ले आणि आता पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ‘ऑपरेशन सिंदूर’ – हे सगळे केवळ हल्ले नाहीत, तर ही नव्या भारताच्या दृढनिश्चय आणि निर्णायक भूमिका बाळगणाऱ्या नव्या भारताची साक्ष आहे.”

8 मे रोजी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये शत्रूच्या हद्दीत 100 किलोमीटर आत घुसून 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. या मोहिमेमध्ये फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्यात आले. हे होते पंतप्रधान मोदींच्या मजबूत राजकीय इच्छाशक्तीचे, भारताच्या अचूक गुप्तचर यंत्रणेचे आणि आपल्या सैन्यदलाच्या ताकदीचे सशक्त प्रदर्शन. एका धाडसी प्रत्युत्तरात, आपल्या सैन्याने 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तानला आरसा दाखवला. बीएसएफचे जवानही सीमेवर ठामपणे उभे राहिले – एक इंचही मागे हटले नाहीत, गोळ्यांना तोफांच्या हल्ल्यांनी उत्तर दिले. हे स्पष्ट संकेत होते की मोदींच्या काळात भारत आपली स्वतःची सुरक्षा नीती तयार करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली, बीएसएफच्या जवानांचे साहस आणि समर्पण देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. युद्ध असो वा शांतता, उणे तापमान असो वा 45 अंश सेल्सिअसचा उन्हाळा, लडाखचे पर्वतरांगेतील क्षेत्र असो किंवा वाळवंटी प्रदेश – बीएसएफ नेहमीच आपल्या कर्तव्यात कधीही कमी पडली नाही. बीएसएफसह सर्व निमलष्करी दलं देशाच्या सीमांचे संरक्षण करताना नेहमीच कटिबद्ध राहिली आहेत. भारताचे पहिले बीएसएफ महासंचालक के. एफ. रुस्तमजी यांना श्रद्धांजली अर्पण करताना अमित शहा यांनी या दलाच्या उल्लेखनीय वाढीचा उल्लेख करत म्हटले की 1965 मध्ये केवळ 25 बटालियन असलेल्या दलाचे आज 192 बटालियनपर्यंतचे विस्तारीकरण झाले आहे.

‘’राष्ट्र प्रथम, सुरक्षा सर्वतोपरी’’ या तत्त्वानुसार काम करणारे अमित शहा यांनी ठामपणे सांगितले की, भारताची सुरक्षा नीती आता बाह्य दबावाखाली चालत नाही. निर्णायक नेतृत्वाचे प्रतीक अमित शहा यांनी स्पष्ट केले की भारत आता ‘बचावात्मक पवित्रा’ तून ‘सक्रिय सुरक्षा जाहीरनाम्या’ च्या दिशेने जात आहे. 

             अमित शहा यांच्याबाबत केवळ धोरण नव्हे, तर त्यांच्या मनोभावनाही बोलतात आणि हाच त्यांना दूरदर्शी राजकारणी म्हणून इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. बीएसएफचा हा कार्यक्रम फक्त लष्करी उत्सव नव्हता, तर भारताच्या विकसित होत असलेल्या सुरक्षा दृष्टिकोनाचा आरसा होता. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत अमित शहा – एक असे नेतृत्व जे धोरणाच्या पलीकडे जाऊन, निश्चयाने भारताला पुढे नेत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार   सोनी…