Home क्राईम गुगल सर्च करून अख्ख कुटुंब संपवून नशेबाज तरुणाची आत्महत्या

गुगल सर्च करून अख्ख कुटुंब संपवून नशेबाज तरुणाची आत्महत्या

0 second read
0
0
301

no images were found

गुगल सर्च करून अख्ख कुटुंब संपवून नशेबाज तरुणाची आत्महत्या 

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमधील एका तरुणानं स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाला संपवून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सगळे मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनास पाठवले. मारेकऱ्यानं हत्या करण्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल गुगलवर सर्च केलं होतं.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. जोधपूरच्या लोहावट तहसीलमध्ये पिलवा गावात ही घटना घडली.

शंकर बिश्नोई असं आरोपीचं नाव आहे. तो ३८ वर्षांचा आहे. त्यानं भाऊ, आई, वडील, दोन मुलांची हत्या केली. शंकर त्याच्या कुटुंबासह शेतात राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. त्यामुळे त्याचं कुटुंब त्रासलं होतं. ३ नोव्हेंबरच्या रात्री शंकरनं संपूर्ण कुटुंबाला लिंबू सरबतामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. या औषधांचा परिणाम काही वेळेत दिसू लागला. सगळे जण बेशुद्ध पडले. त्यानंतर शंकरनं वडिलांची हत्या केली. त्यांचं नाव सोनाराम होतं. ते ५५ वर्षांचे होते. घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात ते झोपलेले होते. आरोपीनं त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला. वडिलांना संपवून शंकर घरात आला. त्यानंतर त्यानं आईची हत्या केली. १२ वर्षांच्या मुलाला कुऱ्हाडीचे वार करुन संपवलं. या दोघांचे मृतदेह त्यानं पाण्याच्या टाकीत फेकले. शंकरचा लहान मुलगा पत्नीच्या शेजारी झोपला होता. शंकरनं पहाटे त्याला उठवलं. तितक्यात बायको झोपेतून उठली. मुलाला कुठे घेऊन जाताय अशी विचारणा पत्नीनं केली. त्यावर लघुशंका करण्यासाठी नेत असल्याचं उत्तर शंकरनं दिलं. यानंतर शंकरनं लहान मुलाची हत्या केली. त्यालाही पाण्याच्या टाकीत टाकलं. यानंतर त्यानं मामाच्या शेतात जाऊन आत्महत्या केली. आरोपीनं पत्नीवर हल्ला केला नाही.

शंकरला २ नोव्हेंबरलाच कुटुंबाला संपवायचं होतं. मात्र झोपेच्या गोळ्यांनी अपेक्षित परिणाम साधला नाही. त्यानंतर ३ नोव्हेंबरला त्यानं लिंबू सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. आरोपी महिन्याभरापासून हत्येचा कट रचत होता. त्यासाठीच्या पद्धती त्यानं गुगलवर शोधल्या. हत्या केल्यानंतर आपण स्वर्गात जाणार की नरकात याबद्दलही त्यानं सर्च केलं होतं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…