
no images were found
सतीश कौशिक यांच्यानंतर ‘परिणीता’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते डायलिसिसवर होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबई- अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी जगाचा निरोप घेतला. ते ६८ व्या वर्षी निधन झाले. आज २४ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. सरकार यांनी परिणीता, लागा चुनरी में दाग, मर्दानी आणि हेलिकॉप्टर ईला या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ते गेले काही दिवस डायलिसिसवर होते आणि त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी खूपच कमी झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे ३ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते डायलिसिसवर होतो आणि अचानक त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली होती. मात्र प्रदीप यांचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात त्यांचे निधन झाले. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. सरकार यांच्या निधनाची बातमी सिनेसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली असून दिग्दर्शकाच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. हंसल मेहता , मनोज बाजपेयीने , अजय देवगणनेही ट्विट करत शोक व्यक्त केला
प्रदीप सरकार हे परिणीता, लागा चुनरी मे दाग, लफंगे परिंदे, मर्दानी, हेलिकॉप्टर ईला यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. प्रदीप यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट बनवले, मात्र त्यांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. चित्रपटांशिवाय त्यांनी ‘फोरबिडन लव्ह’ आणि ‘दुरंगा’ यांसारख्या वेब सीरिजचंही दिग्दर्शन केलं आहे.
प्रदीप हे जाहिरातीच्या क्षेत्रातही सक्रिय होते. ‘धूम पिचाक धूम’, ‘माएरी’, ‘अब के सावन’ यांसारखे सुपरहिट म्युझिक व्हिडीओसुद्धा त्यांनीच शूट केले होते. राजकुमार हिरानीसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी त्यांनी को-एडिटर म्हणून काम केलं होतं.