Home Uncategorized ओळख महाराष्ट्र संस्कृतीची … कार्यक्रम संपन्न

ओळख महाराष्ट्र संस्कृतीची … कार्यक्रम संपन्न

2 second read
0
0
72

no images were found

ओळख महाराष्ट्र संस्कृतीची … कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर :  महाराष्ट्र देशा.. राकट देशा .. कणखर देशा .. अशा या कणखर महाराष्ट्रातला इतिहास आहे… भूगोल आहे. एक समृद्ध परंपराही लाभली . ही परंपरा अर्थातच अध्यात्माची…परमार्थाची आहे. याच परंपरेचे दर्शन घडविणारा , कोल्हापूरकरांची सांस्कृतिक भूक भागविणारा ; वारसा समृद्ध कलेचा …. महाराष्ट्राची लोकधारा; हा कार्यक्रम आज सांय 6 ते 9 या वेळेत पार पडला. याचे उद्‌घाटन ख्यातनाम सिने-नाटय अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्राची परंपरा, ओळख. संस्कृती सांगणाऱ्या या कार्यकमाची सुरुवात भोपाळीने झाली . त्यानंतर कृषी तसेच आदीवासी संस्कृतीची ओळख करून देणारी गीते, महाराष्ट्राची ओळख अर्थातच .. लावणी ,अध्यात्मिक गीते , भजन जागर -गोंधळ , विरश्रीयुक्त पोवाडा , शौर्य गीते, व्यक्तींच्या दांभिकतेवर प्रहार करून त्याला जमिनीवर आणणारे भारुड .आदी गीत – गायनाने शाहू मिलचा परिसर आनंदून गेला. भालकर्स अँकॅडमी चे संजय भालकर आणि त्यांच्या टीमने या कार्यक्रमाद्वारे शाहू कृतज्ञता पर्वाला चार चाँद लावले. विशेषता कार्यक्रमाच्या शेवटी एक गरीब मिल कामगार व छत्रपती शाहू महाराज हे एकमेकांना अन्नाचा घास भरवितात हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक गलबलून गेला .या संगीतमय रजनीला साथ दिली ती गायक,संगीत संयोजक महेश सोनुले , गायिका विदा सोनुले, बाल शाहीर सारंग सोनुले ' शाहीर कृष्णात पाटील तर ढोलकी – गुरु ढोले ,ऑक्टोपॅड – स्वानंद
जाधव , की बोर्डवर साथ दिली ती प्रदीप फिरंगे यांनी . या कार्यक्रमासाठी तितकेच बहारदार निवेदन केले ते विश्वराज जोशी यांनी . तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यकार्यक्रमाला रसिक – दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संस्थेने उपस्थिती दर्शवली .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…