
no images were found
सुवर्णाची स्वादिष्ट बिर्याणी आणि नयनज्योतीच्या रिफ्रेशिंग स्मूदीने परीक्षकांचे मन जिंकले
या आठवड्यात, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिववर सुरू असलेल्या मास्टरशेफ इंडियाच्या फिनालेच्या वाटचालीत सर्वोत्तम ६ होम कुक्सना स्वादिष्ट बिर्याणी बनवण्याचे व त्यानंतर एखादे अनोखे ड्रिंक बनवण्याचे चॅलेंज असणार आहे. शेफ रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना यांना प्रभावित करत करत आता स्पर्धकांसाठी ही स्पर्धा फारच अटीतटीची झाली आहे. हे होम कुक्स आता शेफचा गोल्डन कोट आणि मास्टरशेफ इंडियाचा चषक जिंकण्याच्या जवळ जवळ चालले आहेत.या आव्हानाच्या सुरूवातीस सुवर्णा बागुलला बिर्याणीसाठी मटण हा घटक पदार्थ मिळाला. तिच्या बिर्याणीने रणवीर ब्रारला प्रभावित केले. त्याने सुवर्णाचे कौतुक करताना म्हटले, “ही बिर्याणी मी आख्खी प्लेट खाऊ शकेन.” त्या अनेक मसाल्यांनी बनलेल्या बिर्याणीनंतर होम कुक्सना मिळालेले पुढचे आव्हान असेल, दह्याचा उपयोग करून स्मूदी बनवण्याचे. यावेळी होम कुक नयनज्योतीने बनवलेल्या, बेसिल घातलेल्या उत्कृष्ट स्ट्रॉबेरी स्मूदीने बाजी मारली. परीक्षकांना ती फारच आवडली.