
no images were found
फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यास मान्यता – जिल्हा पुरवठा अधिकारी
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरणव्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचीमाहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही राज्यात पंतप्रधान महोदयांची महत्वाकांक्षी योजना आहे व त्यानुसार संपुर्ण राज्यात या फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे. फोर्टिफाईड तांदुळ थॅलेसिमिया व सिकल सेल, ॲनेमिया रोखण्यासाठी उपयुक्त आहे. फोटिफाईड तांदुळ पाहता सकृतदर्शनी तांदळात भेसळ असल्यासारखा वाटू शकतो हा तांदुळ पाण्यावर तरंगु शकतो. पण तो सामान्य तांदळाप्रमाणे सेवनासाठी वापराला जातो.
फोर्टिफाईड तांदळात लोह, फॉलिक ॲसिड, विटॅमिन B 12 सुक्ष्म अन्नद्रव्ये असुन लाभार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जाणीवपूर्वक वितरण सुरू केले आहे.फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका / अडचणी असतील तर लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.