no images were found
घरफाळा थकीत रक्कमेवरील 40 टक्के दंडव्याज सवलत योजनेचे शेवटचे दहा दिवस
कोल्हापूर : महानगरपालिका करआकारणी व वसुली विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये दि.1 ते 31 मार्च 2023 अखेर 40 टक्के याप्रमाणे सवलत योजना जाहिर केली आहे. दि. 9 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर 50 टक्के सवलत योजनेस प्रतिसाद देत दि.9 फेब्रुवारी 2023 ते दि.21 मार्च 2023 अखेर 10,239 करदात्यांनी रु.16,58,67,594/- इतकी थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केली आहे. महापालिकेकडे दि.1 एप्रिल 2022 ते 21 मार्च 2023 अखेर शहरातील 98,248 करदात्याकडून रु.68,43,86,833/- रक्कम जमा झाली आहे.
दि.1 एप्रिल 2023 पासून घरफाळा विभागाकडून जे थकबाकीदार मिळकतधारक आहेत त्यांचेवर जप्ती, मिळकतीवर बोजा चढवणे, मिळकत सिल करणे अश्या प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी उर्वरीत कालनावधीमध्ये 40 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.