Oplus_131072
no images were found
खेलोमोर तर्फे नाशिक,नागपूर आणि कोल्हापूरमधील क्रीडा ठिकाणांच्या बुकिंगमध्ये वाढ
कोल्हापूर : भारतातील आघाडीचे क्रीडा बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या खेलोमोरला नाशिक,नागपूर आणि कोल्हापूर सारख्या उदयोन्मुख शहरांमध्ये क्रीडा सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. अधिकधिक व्यक्ती आणि कुटुंब फिटनेस व विरंगुळ्यासाठी खेळांकडे वळत असल्याने ही वाढ दिसून येत आहे.
खेलोमोर ने नाशिक शहरातील 30 ते 40 हून अधिक ठिकाणांवर सुलभ बुकिंग उपलब्ध केल्याने नाशिकमध्ये क्रिकेट टर्फ आणि पिकल बॉल कोर्टवर सध्या खेळाडूंची मोठी वर्दळ दिसून येत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे वापरकर्त्यांना खेळ शोधणे,बुक करणे आणि खेळणे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांसाठी खेळ अधिक सुलभ व सोयीस्कर बनला आहे.
हाच कल इतर शहरांतही दिसून येत आहे.नागपूरमध्ये खेलोमोर प्लॅटफॉर्मवर 32 हून अधिक अशा क्रीडा सुविधांची नोंद आहे.तर शिक आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 8 हून अधिक सुविधांची नोंद आहे.
क्रीडा संदर्भात सर्वसामान्यांचा वाढता सहभाग दिसत असताना खेलोमोर तर्फे अशा क्रीडा ठिकाणांचे आपल्या प्लॅटफॉर्मवर असलेले नेटवर्क अधिक मजबूत केले जाईल.जेणे करून क्रीडा परिसंस्थेला चालना मिळेल.