Home आरोग्य देशभरातील वैदूंचे होणार कणेरी मठावर संमेलन

देशभरातील वैदूंचे होणार कणेरी मठावर संमेलन

11 second read
0
0
49

no images were found

देशभरातील वैदूंचे होणार कणेरी मठावर संमेलन

 कोल्हापूर : कर्करोगच काय तर पोटविकारासह अनेक दुर्धर आजारही वनस्पती औषधांच्या सहा्ययाने बरे करणारे देशभरातील वैदू सुमंगलम् लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठावर एकत्र येत आहेत. आरोग्य सुधारण्याबरोबरच उपचारासाठी आयुर्वेदाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने या संमेलनात विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार आहेत.                     आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. त्याच्या उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार, आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातोत. आजही गावागावात पारंपारिक पद्धतीने उपचार करणारे वैदू आहेत. अतिशय दुर्धर रोगही बरा करण्याचा ते केवळ दावा करत नाहीत, तर रूग्ण बराही करतात. सर्वसामान्य लोकांना असे वैदू म्हणजे देवच वाटतात. पण त्यांचे हे ज्ञान कागदोपत्री नसते. त्यामुळे त्याच्या प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात.
      कोणत्या रोगासाठी कोणत्या वनस्पतीचे औषध वापरता येईल, त्याचे प्रमाण काय असेल, ते वापरण्याची पद्धत काय, ते कुठे मिळेल अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे लिखीत स्वरूपात नसतात. त्यांना त्याचे ज्ञान असते, पण कोणतीही पदवी नसते. केवळ पारंपारिक ज्ञानावर आधारित ते उपचार करत असतात. सध्याच्या अतिशय महागड्या उपचारपद्धतीत अनेकदा या वैदू लोकांची मात्रा लागू पडते. त्यामुळे त्यांच्या या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी देशभरातील वैदूंचे संमेलन कणेरी मठावर होत आहे.या महोत्सवात देशभरातील पारंपारिक वैद्यांचे संमेलन होणार आहे. देशाच्या विविध भागात हे वैद्य उपचार करत आहेत. यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर करणाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व वैद्यांना एकत्र करण्याचा कौतुकास्पद उपक्रम महोत्सवात राबविण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…