
no images were found
राऊतांना तुरुंगाबाहेर काढणारे वकील कोल्हापूरचे
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मागील सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावर आपला निर्णय राखून ठेवला होता. खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होऊन ३ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला.
संजय राऊत यांना तुरुंगाबाहेर काढण्यात वकील अशोक मुंदर्गी यांचे मोलाचे सहकार्य आहे. वकील अशोक मुंदर्गी हे कोल्हापूरचे असून त्यांचे बालपण तसेच पदवीपर्यंतचे शिक्षणही कोल्हापूर येथेच झालेले आहे. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईमधील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला गेले. 1976 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी एल. एल. बी.चे शिक्षण पूर्ण करून कोल्हापूरमध्येच वकिलीची सुरुवात केली. 1978 मध्ये मुंबई येथील प्रसिद्ध वकील भीमराव नाईक यांच्या सोबत त्यांनी कामाला सुरुवात केली. न्हेगारी संबंधातील केस लढण्यास त्यांनी 1997 पासून सुरुवात केली. 2004 मध्ये मुंबई हायकोर्टमध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. त्यांना अधिक काळ वकिलीमधील जवळ जवळ ४० वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय नेते, बडे उद्योगपती चित्रपट क्षेत्रातील नामवंत लोकांच्या केसेस लढवल्या आहेत. रिपब्लिक भारत चॅनेलचे संपादक अर्नब गोस्वामी यांचीही केस वकील अशोक मुंदर्गी यांनीच लढवली होती. संजय राऊत यांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे त्यांचा मोठा सहभाग असल्याची चर्चा आहे.