
no images were found
रिवाबा जडेजा गुजरात विधानसभा लढवणार
गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असून प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जडेजा ही निवडणुकीच्या रिंगणार उतरली आहे. भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत जडेजाची पत्नी रीवाबा हिचे तिकीट पक्के केलेले आहे. रिवाबा जाडेजा हिला जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 साली रिवाबा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान येथे भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. बऱ्याच वर्षांपासून याठिकाणी भाजपाचीच सत्ता आहे.